*कोकण Express*
*ना.विजय वडेट्टीवार यांनी वायरी,तारकर्ली,देवबाग नुकसानग्रस्त भागाची केली पाहणी*
*खा.विनायक राऊत, आ. वैभव नाईक यांनी वस्तुस्थितीची दिली माहिती*
तौक्ते चक्रीवादळाच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्याचे खार जमीन विकास,मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार हे सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आले असून आज सकाळी त्यांनी मालवण तालुक्यातील वायरी,तारकर्ली,देवबाग याठिकाणी भेट देऊन नुकसान ग्रस्त भागाची पाहणी केली व एकूण परिस्थितीचा आढावा घेतला. नुकसान भरपाईसाठी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी जाहीर केल्याप्रमाणे येणाऱ्या आठ दिवसात जास्तीत जास्त निधी देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांनी मालवण येथे धूप प्रतिबंधक बंधारे,भूमिगत विद्युत वाहिन्या, शेतीसाठी मंजूर केल्या जाणाऱ्या खार बंधाऱ्या प्रमाणेच मांड बागायतीला देखील खार बंधाऱ्यासाठी निधी मंजूर करण्याची मागणी ना. विजय वडेट्टीवार यांच्याकडे केली.
याप्रसंगी जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी, जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, मुख्यकार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाळा गावडे, विकास सावंत, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर पंचायत समिती सदस्या मधुरा चोपडेकर,काँग्रेस तालुकाध्यक्ष मेघनाद धुरी, आदी उपस्थित होते.