तौक्ती चक्रीवादळातील नुकसानग्रस्तांसाठी शिवसेनेने घेतला पुढाकार

तौक्ती चक्रीवादळातील नुकसानग्रस्तांसाठी शिवसेनेने घेतला पुढाकार

*कोकण  Express*

*तौक्ती चक्रीवादळातील नुकसानग्रस्तांसाठी शिवसेनेने घेतला पुढाकार…*

*एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारातुन सिमेंट पत्रे वाटप…*

*कणकवली ः (संजना हळदिवे)*

तौक्ती चक्रीवादळातील नुकसानग्रस्तांसाठी शिवसेनेने पुढाकार घेतला आहे. आज कणकवलीतील नुकसान झालेल्यांना
दोन ट्रक सिमेंट पत्रे वाटप करण्यात आले. ना.एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या या पत्र्याचे वाटप शिवसेना नेते संदेश पारकर व भैरी भवानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अतुल रावराणे नगरसेवक सुशांत नाईक यांच्याहस्ते कणकवली शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात झाले.
यावेळी युवा सेना सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक राजू राठोड,वागदे उपसरपंच रुपेश आंमडोस्कर, विलास गुडेकर,निसार शेख,सतीश सापळे,ललित घाडीगावकर,अँड चेतन पाटील,बाळू पारकर आदी उपस्थित होते.
यावेळी संदेश पारकर म्हणाले,वादळाच्या माध्यमातून जिल्हयात मोठं संकट उभ राहील आहे.शिवसेनेच्या माध्यमातून
ना.एकनाथ शिंदे यांच्याकडून उपलब्ध झालेले पत्रे नुकसान झालेल्या प्रत्येक कुटुंब प्रमुखाकडे सुपूर्त केले जात आहेत.शासनाची मदत ही मिळणार आहेच मात्र प्रत्येक संकटकाळी सर्वप्रथम शिवसेना पक्षच धावून येत असतो. या संकटातहि हे सिद्ध झाले आहे.कणकवली तालुक्यात ही घरांची छपरे,शेती,बागायतीचे अतोनात नुकसान झाले आहे. दुसरिकडे विद्युत पोल पडून नुकसान झाले आहे.अशा परस्थितीत पालकमंत्री उदय सामंत,खास.विनायक राऊत ,आम.दीपक केसरकर,आम.वैभव नाईक यांच्या माध्यमातून जिल्हयातील जनतेला मदत कार्य सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
अतुल रावराणे म्हणाले,
ज्या ज्यावेळी जनतेवर संकट येते त्या- त्यावेळी शिवसेना पक्ष मदतीसाठी धावते.हा इतिहासा आहे.सिंधुदुर्गात चक्रीवादळाने नुकसान झाल्या नंतर पहिल्यांदा शिवसेनेने मदत कार्य केले आहे.२० टक्के राजकारण आणि ८० टक्के समाज कारण हे ब्रीद घेऊन वावरत असलेल्या शिवसेनेने सामजिक भान राखले असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तात्काळ पाहणी करत कोकणातील जनतेला दिलासा आहे.मात्र गुजरातसाठी १ हजार कोटीचे पॅकेज देणाऱ्या पंतप्रधाकडून महाराष्ट्रसाठी पॅकेज जाहीर करतील अशी अपेक्षा होती.मात्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जनतेचा भ्रमनिरास केला असून केंद्र सरकार दुजाभाव करत असल्याचा आरोप ही त्यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!