विरोधकांप्रमाणे मी वैफल्यग्रस्त नाही- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

विरोधकांप्रमाणे मी वैफल्यग्रस्त नाही- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

*कोकण Express*

*विरोधकांप्रमाणे मी वैफल्यग्रस्त नाही- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे*

*सिंधुदुर्ग ः (संजना हळदिवे)*

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तौक्ते वादळाच्या नुकसानीसंदर्भात पाहणी करण्यासाठी कोकण दौऱ्यावर गेले असता विरोधकांनी त्यांच्यावर तोफ डागली. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, “विरोधी पक्षनेत्यांप्रमाणे मी वैफल्यग्रस्त नाही.”

उद्धव ठाकरे कोकण दौऱ्यावर असतांना मालवणमधील चिवला बीच याठिकाणी प्रसारमाध्यमांशी बोलत होते. कोकण किनारपट्टीवर पाहणी केल्यानंतर त्यांनी विश्वास व्यक्त केला, “पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संवेदनशील व्यक्ती असून गुजरातप्रमाणे ते महाराष्ट्रालाही मदत करतील.”

दरम्यान कोकण किनारपट्टीवरील एकूण परिस्थिती स्पष्ट करताना त्यांनी सांगितलं, “तौक्ते हे गेल्या दशकभरातील आतापर्यंतचे भीषण वादळ होते. हवामान बदलतंय आणि विविध वादळे महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर येऊ लागली आहेत. यामुळे होणारे नुकसान रोखण्यासाठी एक निश्चित उपयुक्त आराखडा जिल्ह्यांनी तयार केला असून तो लागू करण्यासाठी पंतप्रधानांनी निधी उपलब्ध करून द्यावा.”

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातला या वादळाची नुकसानभरपाई म्हणून भरभरून मदत केली आहे. त्याबद्दल प्रतिक्रिया विचारली असता उद्धव ठाकरे ‘’आपण यात राजकारण आणणार नसल्याचे’’ म्हणाले. “नरेंद्र मोदी गुजरातप्रमाणेच महाराष्ट्राच्याही पाठीशी उभे राहतील” असा विश्वास असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

महाराष्ट्र सरकारने कोकणला मदत पुनर्वसन निधी देण्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणविसांनी टीका करतांना म्हटले, “कोकणाने शिवसेनेला खूप काही दिलंय, आता शिवसेना कोकणासाठी काय करते ते बघावं लागेल.” त्या टीकेला प्रत्युत्तर देतांना मुख्यमंत्री म्हणाले, “विरोधकांनी त्याची चिंता करण्याची गरज नाही. त्यांनी कितीही प्रयत्न केला तरी कोकण व शिवसेना यांचं नातं कधीही कमकुवत होणार नाही.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!