*”छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना २०१७” मधील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या खावटी कर्ज रक्कम द्यावी…*

*”छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना २०१७” मधील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या खावटी कर्ज रक्कम द्यावी…*

*कोकण  Express*

*”छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना २०१७” मधील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या खावटी कर्ज रक्कम द्यावी…*

जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

*कणकवली : (संजना हळदिवे)*

शासनाने “छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७” च्या कर्जमाफी योजनेत समावेश केलेल्या खावटी कर्जाची शासन आदेशाप्रमाणे रक्कम मिळणेसाठी पत्रव्यवहार करणेत आला आहे. आमच्या सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेशी संलह्ण २२६ प्राथमिक विकास संस्थांच्या कर्जमाफीस पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या संस्थानिहाय तयार केलेल्या याद्यांमधून अल्प मुदत शेतीपूरक खावटी कर्ज ( consumption loan  ) वितरित केलेल्या थकीत व प्रोत्साहनपर सभासदांना वगळण्यात आले होते. त्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या सहकार पणन व वस्त्रोउद्योग विभाग शासन निर्णय क्र. कृकमा १०१८ / प्रा. क्र. १५५/ २- स दि. १३ फेब्रुवारी २०२१ च्या आदेशांव्ये खावटी कर्जचा छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ मध्ये समावेश करणेत आला आहे. याकडे जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले.सदर आदेशानुसार जिल्ह्यातील व ७५६४ सभासदांच्या रक्कम रु. १२७४. ७१ लाख रक्कमेची माहिती शासकीय लेखापरीक्षा यांचेकडून तपासणी होऊन त्यांच्या याद्या महाऑनलाईनकडे ईमेल द्वारे सादर केल्या आहेत.
परंतु  सदर सभासदांना अद्यापही खावटी कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. सदरचा लाभ न मिळालेल्याने सदर कर्जदार थकबाकीमध्ये दिसत असून त्यांना कर्जवाटपापासून वंचित राहावे लागले आहे व त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची जमीन कर्जअभावी करता आलेली नाही तसेच सदर कर्जावरील व्याज वाढत असून जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
शासन आदेशाप्रमाणे सदर शेतकऱ्यांच्या कर्जावर दि. ३१/७/२०१७ पर्यंत आकारणी केले असून त्यानंतर दि. ३१/३/२०२१ पर्यंतचे थकीत कर्जदार सभासदांचे व्यास अंदाजे रु. १. ५८ कोटी एवढे होणार आहे.  त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून सोडवून नव्याने शेती कर्ज मिळण्यासाठी असलेल्या थकीत कर्ज व त्यावरील आजअखेर पर्यंतचे व्याज मिळून रक्कम रु. १३७४. ७१ लाख मिळणे आवश्यक आहे.  तरी जिल्ह्यातील  संस्थांच्या शेतीपूरक खावटी सभासदांना महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग शासन निर्णय  कृकमा १०१८ / प्रा. क्र. १५५/ २- स दि. १३ फेब्रुवारी २०२१ च्या आदेशान्वये कार्यवाही होऊन रक्कम मिळणेस  विनंती आहे अशी मागणी सतीश सावंत यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!