*कोकण Express*
*राज्याच्या सहकार मंत्र्यांचे कणकवलीत आगमन*
**कणकवली ः ( संजना हळदिवे)*
तौक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे सहकार कॅबिनेट मंत्री बाळा पाटिल आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली येथे आले असता, त्यांचे स्वागत राष्ट्रवादीचे नेते तथा नगरसेवक अबिद नाईक यांनी केले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यतील तौक्ते चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या जनतेला शासनाकडून जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्याची अबिद नाईक यांनी मागणी केली आहे. त्यावेळी माजी राष्ट्रवादी ग्राहक स्वरक्षण जिल्हा अध्यक्ष दिलीप वर्णे, माजी जिल्हा उपाध्यक्ष सुभाष सावंत, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष इम्रान शैख़, अनीस नाईक, विलास गावकर, युवक शहर अध्यक्ष निशिकांत कडुलकर, राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष अमित केतकर, गणेश चौगुले, विशाल ठाणेकर, राष्ट्रवादी शहर सरचिटणीस विशाल पेडणेकर, माजी युवक तालुकाध्यक्ष सागर पवार आदि उपस्थित होते.