*कोकण Express*
*तौक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील झालेल्या नुकसानीची भरपाई पाटबंधारे भूसंपादन निकषाप्रमाणे द्यावी*
*मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांची मागणी…*
*कणकवली ः ( संजना हळदिवे)*
तीन दिवसापूर्वी अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तौक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील घरे, गोठे, मच्छिमार नौका, आंबा-काजू, नारळी, पोफळी, कोकम, केळी बागा, शेती, शाळा, शेतकरी, मच्छिमार व सर्वसामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान व हानी झालेली आहे कोकणातील शेतकऱ्यांना आंबा, काजू, नारळ, पोफळी, कोकम, केळी उत्पन्न मिळवून देणारी झाडे व बागा चक्रीवादळामुळे भुई सपाट झालेल्या आहेत. त्यामुळे या झाडांना पाटबंधारे खात्याच्या भूसंपादन निकषाप्रमाणे तातडीने मदत द्यावी अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी केली.