*कोकण Express*
*चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर बाळासाहेब पाटील यांनी करुळ येथे नुकसानीची केली पाहणी…*
*करुळ चेकपोष्टवर सतिश सावंत यांनी सहकारमंत्र्यांचे केले स्वागत…*
*वैभववाडी ः प्रतिनिधी*
जिल्ह्यात आठ दिवसापूर्वी झालेल्या तौक्ते चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका वैभववाडी तालुक्याला बसला आहे. या चक्रीवादळात लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील वैभववाडीत दाखल झाले आहेत. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतिश सावंत यांनी त्यांचे स्वागत केले आहे. दरम्यान सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी करुळ जामदारवाडी येथे नुकसानीची पाहणी केली.
यावेळी राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सावंत, काका कुडाळकर, बँक संचालक दिगंबर पाटील, सुनिल भोगटे, राजन नानचे, प्रांताधिकारी वैशाली राजमाने, तहसिलदार रामदास झळके यांच्यासह अधिकारी व तलाठी उपस्थित होते.