*कोकण Express*
*कालपर्यंत आम्ही बहुजन वादाची भूमिका घेतली आता आम्ही मराठावादाची भूमिका घेणार:-ऍड सुहास सावंत*
*जो कोण मराठा समाजाच्या विरोधात बोलेल त्याला इथून पुढे सिंधुदुर्ग जिल्ह्यात फिरायला देणार*
*कुडाळ ः प्रतिनिधी*
महाराष्ट्राचे पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी काही दिवसांपूर्वी मराठा समाजाला आरक्षण ओबीसी मधून देणारच नाही अशा प्रकारची जातीयवादी भूमिका घेतली होती. वास्तविक पाहता एखादा मंत्री ज्यावेळी मंत्रीपदाची शपथ घेतो त्यावेळी त्यांनी संविधानाप्रमाणे वागण्याची शपथ घेतलेली असते आणि संविधानाने पद्धतीने मराठा समाज आरक्षण मागत होता आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांनी एक जातीयवादी भूमिका घेतलेली होती आणि या जातीयवादी भूमिकेचा निषेध करण्याचे आम्ही ठरवले होते आणि त्याप्रमाणे इशारा दिला होता याचा निषेध करणार आणि त्याच आम्ही निरदर्शन करणार प्रशासन मराठा समाजाच्या भूमिकेला एवढे घाबरलो कि त्याचा जो पूर्वनियोजित दौरा होता त्याप्रमाणे ते कुडाळ मध्ये येणार होते. परंतु त्यांनी आपला दौरा ओरोस मध्ये त्यांनी मुक्काम ठरवला परंतु आम्ही मराठा समाजाचे मावळे पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असताना सुद्धा मराठा समाजचे पदाधिकारी कार्यकर्ते ओरोस रेस्ट हाऊस पोहचले व त्यांनी त्या निषेध व्यक्त करत निदर्शन केली. ऍड सुहास सावंत यांनी सांगितले इथून पुढे ह्या ठिकाणी आम्ही प्रशासनाला व महाविकास आघाडी सरकारला एवढा इशारा देऊ इच्छितो आणि समस्त लोकांना जे कोण मराठा समाजाच्या विरोधात वक्तव्य करणारे असतील तर त्यांना या ठिकाणी अश्याच प्रकारे सिंधुदुर्ग जिल्ह्यात मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागेल.कालपर्यंत आम्ही बहुजन वादाची भूमिका घेतली आता आम्ही मराठावादाची भूमिका घेणार इथून पुढे जो कोण मराठा समाजाच्या विरोधात बोलले त्याला इथून पुढे सिंधुदुर्ग जिल्ह्यात फिरायला नाही देणार.अन्यथा जे कोणी असे येतील त्याना अश्याच प्रकारे त्याना उत्तर देणार.व येत्या 27 तारीखला छत्रपती संभाजीराजे हे आपली भूमिका घेतील आणि त्याप्रमाणे पुढची रणनीती सिंधुदुर्ग जिल्हा सकल मराठा समाजाचे आंदोलन ठरवली जाणार.त्यावेळी उपस्थित सिंधुदुर्ग जिल्हा सकल मराठा समाज अध्यक्ष ऍड सुहास सावंत,प्रभाकर सावंत,दादा साईल,धीरज परब,सुनील सावंत, प्रशांत राणे,दिनेश महाडगुत,रुपेश बिडये,सुंदर सावंत,निलेश परब,दिनेश वारंग,बंड्या सावंत,वैभव जाधव,केदार राऊळ,राजवीर पाटील,भूषण राणे, संग्राम सावंत,प्रथमेश परब,आदी मराठा बांधव हे ओरोस पोलीस ठाण्यातून बाहेर येते वेळी उपस्थित होते.