सिंधुदुर्गातील तोक्ते वादळाच्या महाप्रलयानंतर देवबागवासियांसाठी मनसेचे जिल्हा पदाधिकारी सरसावले

सिंधुदुर्गातील तोक्ते वादळाच्या महाप्रलयानंतर देवबागवासियांसाठी मनसेचे जिल्हा पदाधिकारी सरसावले

*कोकण  Express*

*सिंधुदुर्गातील तोक्ते वादळाच्या महाप्रलयानंतर देवबागवासियांसाठी मनसेचे जिल्हा पदाधिकारी सरसावले*

*बंद असलेल्या मोबाईलसाठी मनसे नेते परशुराम उपरकर यांनी जनरेटरही केला उपलब्ध*

*मालवण ः प्रतिनिधी*

एकीकडे आज मुख्यमंत्री मालवणात येतात आणि काहीही मदत जाहिर न करता चिवला बीच वर पर्यटन फेरफटका मारताना दिसले असे असताना दुसरीकडे मात्र मनसेचे जिल्हा पदाधिकारी त्याचवेळी देवबाग, तारकर्लीत ठाण मांडत सौरकंदील व दिवे यांचे वाटप करताना दिसले.यावेळी तालुका अध्यक्ष विनोद सांडव,मनविसे माजी जिल्हा अध्यक्ष अमित इब्रामपूरकर,उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री,शैलेश अंधारी,मनविसे तालुका अध्यक्ष विनायक गावडे,विजय पेडणेकर,प्रशांत उपरकर,जिल्हा सचिव बाळा पावसकर,मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर,कुडाळ तालुकध्यक्ष प्रसाद गावडे,कुडाळ सचिव राजेश टंगसाळी,माजी तालुकाध्यक्ष बाबल गावडे, कुडाळ उपतालुकाध्यक्ष दीपक गावडे,कुडाळ शहर सचिव रमाकांत नाईक,नेरूर शाखाध्यक्ष प्रथमेश ठाकूर,विशाल ओटवणेकर,वेंगुर्ला उपतालुका अध्यक्ष विशाल माडये,प्रतिक कुबल,साईराज चव्हाण आदी उपस्थित होते.तोक्ते वादळाचा सर्वाधिक फटका हा मालवण तालुक्यातील देवबाग या गावाला बसला.गावात अनेक विजेचे खांब,नारळाची झाडे,सुरुची झाडे पडून तेथील लोकांच्या घरांचे नुकसान झाले.अनेक लोकांच्या मालमत्तेचे अतोनात नुकसान झाले.वीजेचे खांब,तारा कोसळुन अजुनही रस्त्यावर आहेत.वीजपुरवठा सुरु करण्यासअजुनही ४ ते ५ दिवस लागण्याची शक्यता आहे.मनसे नेते परशुराम उपरकर यांनी तातडीने मनसे तालुका अध्यक्ष विनोद सांडव,अमित इब्रामपूरकर यांना दिवे उपलब्ध करुन देण्याची सुचना केली.मनसेच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांनी ताबडतोब देवबाग तारकर्ली येथे धाव घेत सौरकंदील व दिवे यांचे वाटप आज केले.सदर सौरकंदील व दिवे मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी स्वखर्चाने उपलब्ध केले आहेत.तसेच मोबाईलसाठीही मनसे नेते परशुराम उपरकर यांनी जनरेटरही उपलब्ध केला असुन यासाठी देवबाग येथील निलेश सामंत,अवी सामंत यांनी मनसे कार्यकर्त्यांना मोलाचे सहकार्य केले.पिण्याच्या पाण्याची समस्या समजताच कार्यकर्त्यांनी १५००० लीटर पाणीपुरवठा केला आहे कोणतीही सत्ता नसताना किंवा निवडणुका नसताना मनसेने देवबाग व तारकर्ली ग्रामस्थांसाठी केलेल्या व्यवस्थेसाठी येथील नागरीकांनी मनसे नेते परशुराम उपरकर, विनोद सांडव,अमित इ.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!