*कोकण Express*
*डिजिटल युवा फोरमच्या पोर्टलवर कोरोना स्थितीची माहिती*
*वेंगुर्ले ःःप्रतिनिधी*
युवा फोरम भारत संघटने तर्फे कोरोना काळात लोकांना सरकारी दवाखान्यात होणाऱ्या अपुऱ्या सोयी सुविधा व गैरसोय यामुळे सामान्य लोकांचे हाल होत व मनस्ताप सहन करावा लागत आहे . या वर उपाय म्हणून लोकांना सुखकर व्हावे या साठी एक डिजिटल युवा फोरम मार्फत पोर्टल सुरू केले आहे. त्यामध्ये पूर्ण महाराष्ट्र भर असलेल्या कोविड सेंटर, रुग्णालय, दवाखाने या मधील उपलब्ध असणाऱ्या बेड ची संख्या, ऑक्सिजन, त्या रुग्णालय वा दवाखान्याचे संपर्क क्रमांक आणि त्यातील उपलब्ध सोयी आपल्याला पाहायला मिळतील तसेच व्हॅक्सिनेशन रजिस्ट्रेशन साठी देखील स्वयंसेवकांचे संपर्क क्रमांक दिले गेले आहेत व कुठलीही गैरसोय न होता लोकांना उपचार घेण्यास सोईचे होईल. अशी माडणी करण्यात आली आहे. ह्या डिजिटल पोर्टलचे उद्घाघाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ह्यांच्या शुभ हस्ते जिल्हाधिकारी, पालकमंत्री, खासदार , आमदार पोलीसअध्यक्ष व नेतेमंडळी यांच्या उपस्थितीत सिंधुदुर्गात करण्यात आले. हा पोर्टल उपलब्ध करून दिल्याबद्दल आरोग्य प्रशासनाला मदत होणार असल्याने प्रशासने कौतुक करून आभार मानले आहेत. या पोर्टलची निर्मिती युवा फोरम भारत संघटनेच्या कल्पनेतून फोरमचे डिजिटल हेड राधाकृष्ण भोगटे यांनी केले आहे. व हे सामान्य नागरिकांसाठी उपलब्ध करून लोकार्पण करण्यात आले. यावेळी युवा फोरम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष यशवर्धन राणे, उपाध्यक्ष अमोल निकम, सचिव ॲड. हितेश कुडाळकर आणि डिजिटल हेड राधाकृष्ण भोगटे उपस्थित होते.