मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी मालवण येथील नुकसानीची केली पाहणी

मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी मालवण येथील नुकसानीची केली पाहणी

*कोकण Express*

*मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी मालवण येथील नुकसानीची केली पाहणी*

*मालवण ः प्रतिनिधी*

मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचे सिंधुदुर्गात आगमन झाले असून तौक्ते चक्रीवादळामुळे मालवण तालुक्यात झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष स्पॉट वर जाऊन त्यांनी पाहणी केली. यावेळी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी मुख्यमंत्र्यांना मालवण मधील नुकसानीच्या वस्तुस्थितीची माहिती दिली. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी नागरिकांची आपुलकीने विचारपूस करत त्यांना धीर दिला.तसेच महाविकास आघाडी सरकार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचा विश्वास दिला.
यावेळी खासदार विनायक राऊत,परिवहन मंत्री अनिल परब, पालकमंत्री उदय सामंत, मुख्यमंत्री यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर, आमदार दीपक केसरकर,आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, जिल्हापोलिस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, संदेश पारकर, अतुल रावराणे,बबन शिंदे, हरी खोबरेकर,महेश कांदळगावकर आदिंसह शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!