कणकवली न.प.च्या कोविड केअर सेंटरचे शिवसेनेने अनुकरण करावे; भाजपा आमदार नितेश राणे यांचे विरोधकांना आवाहन

कणकवली न.प.च्या कोविड केअर सेंटरचे शिवसेनेने अनुकरण करावे; भाजपा आमदार नितेश राणे यांचे विरोधकांना आवाहन

*कोकण  Express*

*कणकवली न.प.च्या कोविड केअर सेंटरचे शिवसेनेने अनुकरण करावे; भाजपा आमदार नितेश राणे यांचे विरोधकांना आवाहन*

*कोविड केअर सेंटरची केली पाहणी*

*नगराध्यक्ष नलावडे व नगरसेवकांचे केले कौतुक

*टीका करण्यापेक्षा विधायक कार्य करा, विरोधकांना दिला सल्ला*

*कणकवली ः प्रतिनिधी*

कणकवली नगरपंचायतच्या कोविड केअर सेंटरला भाजपा आमदार नितेश राणे यांनी भेट दिली. या कोविड केअर सेंटरमध्ये उपलब्ध असलेल्या सोयीसुविधाची माहिती घेत, खूप उत्तम प्रकारच्या सोयीसुविधा नगराध्यक्ष समीर नलावडे व त्यांच्या टीमने उपलब्ध करून दिल्या बद्दल कौतुक केले. तसेच जिल्ह्यामधील राजकीय टीकाकारांनी आणि सत्ताधाऱ्यांनी या कोविड सेंटरचे अनुकरण करावे असे आमदार नितेश राणे यांनी आवाहन केले.

तसेच हे कोविड केयर सेंटर उभारण्यासाठी विरोधकांनी जो वेळ काढूपणा करून राजकारण केले त्याच्याबद्दल नाराजी व्यक्त करत कोरोना काळात शिवसेनेने राजकारण करू नये असाही त्यांनी विरोधकांना सल्ला दिला. यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे ,उपनगराध्यक्ष बंडू हर्णे,मिलींद मेस्त्री, गटनेते संजय कामतेकर, नगर सेवक अभि मुसळे,विराज भोसले,मेघा गाणगं,बाबू गायकवाड,उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!