*कोकण Express*
*आमदार नितेश राणे यांनी कणकवली तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची केली पाहणी*
*बिडवाडी, करंजे, नागवे, हरकूळ, फोंडाघाट, हरकुळ खुर्द या गावांतील नुकसानग्रस्त भागाला दिली भेट*
*कणकवली ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्ह्याला तौक्ती चक्रीवादळाचा भयंकर फटका बसल्यामुळे अनेकांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. कणकवली तालुक्यातही तौक्तीच्या झंझावाताने अनेकांची घरे, संसार मोडकळीस आले आहेत. पंचक्रोशीत अनेक ठिकाणी झाडं पडून नुकसान झालं आहे. तसेच घरावरील पत्रे वादळात उडून गेले आहेत. कणकवली तालुक्यातील या साऱ्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आमदार नितेश राणे यांनी आज भेट दिली.
तालुक्यातील बिडवाडी, करंजे, नागवे, हरकूळ, फोंडाघाट, हरकूळ खुर्द या गावांना भेट देत आमदार नितेश राणे यांनी नुकसान झालेल्या भागाची पाहणी करत एकूण नुकसान भरपाईचा आढावा घेतला. तसेच नुकसान झालेल्या नागरिकांची आस्थेने चौकशी करत नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळेल, अशी ग्वाही देखील दिली.
यावेळी गोट्या सावंत, सभापती मनोज रावराणे, प्रकाश पारकर, मिलिंद मेस्त्री, राजू पेडणेकर, राजन चिके, कणकवली तहसीलदार रमेश पवार, बीडीओ अरुण चव्हाण, चव्हान, फोंडाघाट तलाठी अर्जुन पंडित, मामा हळदीवे, फोंडाघाट सरपंच संतोष आंग्रे, सुजाता हळदीवे, सुनील लाड, श्री. जाधव, राजा डिचवलकर, सर्वेश दळवी, बाबू रासम, हरकुळ खुर्दच्या तलाठी राजेंद्र तांबोस्कर तसेच हरकूळ खुर्द गावचे सरपंच व पोलिस पाटील, बिडवाडी गावच्या तलाठी श्रद्धा कोरगावकर, संदीप चव्हाण, संदीप सावंत, राजू हिर्लेकर तसेच सदर गावचे सरपंच व उपसरपंच आदी उपस्थित होते.
