आरोग्य सेवेसाठी खर्च केलेल्या २१ कोटीचापर्दाफाश करणार

आरोग्य सेवेसाठी खर्च केलेल्या २१ कोटीचापर्दाफाश करणार

*कोकण Express*

*आरोग्य सेवेसाठी खर्च केलेल्या २१ कोटीचापर्दाफाश करणार*

*आमदार नितेश राणे यांचा इशारा,एवढा निधी खर्च झाला तर सेवा का मिळत नाही, जीव का जातात केला सवाल*

*कणकवली ः प्रतिनिधी*

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना दिवसेंदिवस वाढत आहे.रुग्ण मृत्यूचे प्रमाण वाढत आहे मात्र सेवा सुविधा काहीच नाहीत. कोव्हीड सेवेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात २१ कोटी खर्च केले ते गेलेत कुठे ? जनतेचा एवढा पैसा खर्च केलात तर आजही ऑक्सिजन,व्हेंटिलेटर,बेड का नाहीत ? लोकांचे जीव का जात आहेत ? असा संतप्त सवाल आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत केला.पुराव्यासह २१ कोटीच्या खर्चाचा पर्दाफाश करणार असल्याचे इशाराही आमदार राणे यांनी दिला.
जनतेच्या आरोग्यासाठी कोणतेही नियोजन नाही म्हणून उपचारासाठी तासनतास जिल्हा रुग्णालया बाहेर रुग्णवाहिका रुग्ण घेऊन थांबून असतात त्यातच रुग्ण दगावतात हा गँभिर प्रकार आहे.तो प्रशासनाच्या आणि सत्ताधाऱ्यांच्या अपयशामुळे थांबत नाही.कणकवली उपजिल्हा रुग्णालयात बंद असलेले व्हेंटिलेटर सुरू करण्यासाठी लागणारा ऑक्सिजन देतो म्हणून सांगूनही ते ऑक्सिजन नाही म्हणून व्हेंटिलेटर सुरू करत नाहीत अशी असेही आमदार राणे यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!