*कोकण Express*
*सत्ताधारी निधी आणण्यात अपयशी; क्षमता असेल तर गतवर्षाच्या नुकसानीचा निधी आणून दाखवावा*
*भाजपा आमदार नितेश राणे*
कणकवली ः प्रतिनिधी (संजना हळदिवे)*
गेल्यावर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे जिल्हावासियांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले . प्रशासनाने 8 कोटी 73 लाख रुपयांच्या नुकसानीचे पंचनामे करून ती रक्कम शासनाकडे मागणी केली. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 25 कोटीची मदत कोकणातील शेतकऱ्यांना नुकसानग्रस्तांना जाहीर केले. मात्र मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली रक्कम मिळालीच नाही. व गतवर्षी निसर्ग चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. त्या आठ कोटीचा पंचनाम्या पैकी केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्याला 49 लाख 60 हजार रुपये मिळाले मग आता सत्ताधारी पालक मंत्री आमदार खासदार हे पंचनामे करण्याचे आदेश देत आहेत. मग जे पंचनामे गेल्यावर्षी पंचनामे केले त्याची ती रक्कम मिळाली नाही. त्यामुळे आताचे आदेश व पंचनामे व नुकसानीचे पाहणी दौरे हे फोटोसेशन पुरतेच आहेत का ? असा सवाल आमदार नितेश राणे यांनी उपस्थित केला. यावेळी त्यांनी सत्ताधारी आमदार-खासदार यांच्यासह सरकारवर टीकेची झोड उठवली. या सरकारकडून काही अपेक्षा ठेवू शकत नाही. त्यामुळे यासंदर्भात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधले असून कोकणातील नुकसानग्रस्त लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्यपालांचे लक्ष वेधण्यात येणार असल्याची माहिती आमदार नितेश राणे यांनी दिली. कोकणातील जनतेची फसवणूक महा विकास आघाडी सरकार करत असून पंचनामे केले जातात मात्र त्याचे पुढे काय होते. समजत नाही. सत्ताधारी निधी आणण्यात अपयशी झाल्याचा आरोप राणे यांनी केला. पालकमंत्री, आमदार व खासदार यांची जर क्षमता असेल तर त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गतवर्षीच्या नुकसानीचा अगोदर निधी आणून दाखवावा असे आवाहन आमदार राणे यांनी दिले.