*कोकण Express*
*तौक्ते चक्रीवादळाच्या तडाख्यात नुकसानग्रस्त भागात अध्यक्ष संजना सावंत यांचा दिलासा…..*
*सिंधुदुर्ग:-(संजना हळदिवे)
तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या नुकसानीच्या अनुषंगाने पहाणी करणे, स्थानिक ग्रामस्थांशी संवाद साधणे, नुकसानीची तीव्रता जाणून अनुषंगिक उपाययोजना करणे यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत यांनी दिनांक १७.०५.२०२१ रोजी मालवण तालुक्यापासून नुकसानग्रस्त भागाची पहाणी चालू केली. आज दी.१८.०५.२०२१ रोजी कणकवली तालुक्यातील नरडवे पंचक्रोशीतील भेद्रे वाडी, मोहम्मद वाडी, कोके वाडी, रांजणवाडी येथे भेटी दिल्या यावेळी नरडवे सरपंच अमिता सावंत, उपसरपंच सुरेश ढवळ व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. दिगवळे येथील भेटीत सरपंच सानिका सुतार, माजी पंचायत समिती सदस्य राजश्री पवार ग्रामपंचायत सदस्य भाई चव्हाण होते.तसेच सांगवे पंचक्रोशीतील भेटीत सरपंच मयुरी मुंज व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.या परिसरातील नुकसानीमुळे बाधित क्षेत्राची पाहणी केली.
यावेळी चक्रीवादळाच्या तडाख्याने मूळे लोकांची राहती घरे, गोठे, जनावरे याचे झालेले नुकसान, बागायतीचे झालेले नुकसान, शासकीय मालमत्तेचे नुकसान यामध्ये स्मशान शेड ,शाळा या बाधित घटकांची पाहणी केली. यावेळी नुकसानग्रस्त लोकांशी चर्चा करून त्यांच्या भावना विचारात घेतल्या तसेच शासनाकडून आवश्यक ती सर्व नुकसानभरपाई मिळणेबाबत आपल्या भावना प्रभावीपणे मांडणार असल्याची खात्री देखील दिली. तसेच ग्रामसेवक व तलाठी यांचेमार्फत संयुक्तपणे नुकसानग्रस्त क्षेत्राची पंचयादी करताना नुकसान धारकाशी चर्चा करूनच अहवाल अंतिम करण्याबाबत च्या सूचना देखील अध्यक्ष यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या.
या पाहणी दौऱ्यात शासकीय यंत्रणे मध्ये पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, सहाय्यक गटविकास अधिकारी हजारे, विस्तार अधिकारी ग्रामपंचायत सूर्यकांत वारंग, विस्ताराधिकारी शिंदे, ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील ग्रामसेवक, भागातील तलाठी व ग्रामस्थ उपस्थित होते.