*कोकण Express*
*कणकवली पटवर्धन चौकात रॅपिड टेस्टमध्ये एका महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह*
*कणकवली शहरातील रुग्णसंख्येत होतेय वाढ*
*कणकवली ः प्रतिनिधी*
शहरात पॉझिटिव्ह रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच कणकवली पटवर्धन चौकात कार्यरत असलेल्या आरोग्य पथकाकडून रॅपिड टेस्ट मुळे आतापर्यंत शहरातील अनेक रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. आरोग्य पथकाकडून सातत्याने कोरोना ची लक्षणे असणाऱ्या व्यक्तींची रॅपिड टेस्ट करण्यात येत आहे. अशाच पद्धतीने आज केलेल्या टेस्टमध्ये कणकवली आंबेआळी येथील 74 वर्षीय महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे कणकवली शहरात देखील कोरोना रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. या आरोग्य पथकामध्ये समुदाय आरोग्य अधिकारी तेजस्वी पारकर, शिक्षक प्रदीप मांजरेकर, गिलबर्ट फर्नांडिस यांचा समावेश आहे.