*कोकण Express*
*चक्रीवादळाचा सर्वात जास्त महावितरणला फटका…*
तौत्के चक्रीवादळाचा सर्वात जास्त फटका महावितरणला बसला आहे.यात तब्बल ८८० पोल तुटले असून ४६० विद्युत वाहिन्या तुटल्या आहेत.त्यामध्ये ३३० लो टेन्शन आणि १३० हाय टेन्शन विद्युत वाहिन्यांचा समावेश आहे.त्याशिवाय जिल्ह्यात ८८० विद्युत पोलही तुटले आहेत. विद्युत वितरणच्या नुकसानीचा प्राथमिक आकडा हा सुमारे पावणे दोन कोटी रुपयांचा आहे. त्याशिवाय वादळामुळे जिल्ह्यातील २१ सब स्टेशन ही बंद पडली होती. दुपारपर्यंत त्यापैकी १२ ते १३ सब स्टेशन सुरू करण्याचे काम पूर्ण झाले होते.तर उर्वरीत सबस्टेशन सुरू करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.त्यासाठी बाहेरील जिल्ह्यातील मनुष्यबळही जिल्ह्यात दाखल होत आहे.