*कोकण Express*
*चक्रीवादळात झालेल्या नुकसानीची जास्तीत जास्त भरपाई मिळवून देणार-नितेश राणे*
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेचे तौत्के चक्रीवादळत फार मोठे नुकसान झाले आहे.नुकसानग्रस्थ कुटुंबांना सरकार कडून जास्तीत जास्त मदत मिळवून देणार,त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचा विश्वास भाजपा आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला आहे.
आमदार नितेश राणे यांनी चक्रीवादळात झालेल्या नुकसानीची माहिती प्रशासनकडून घेतल्या नंतर ट्विट करून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला धीर दिला आहे.मच्छीमार बंधवांना सुद्धा नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आम.नितेश राणे यांनी आश्वासन दिले आहे.
आमदार नितेश राणे यांनी केलेल्या ट्विट मध्ये म्हटले आहे की,”सिंधदुर्गात वादळामुळे खुप नुकसान झाले आहे .. घरे, गोठे , बागा , मछिमारांचे पण खुप नुकसान झाले आहे असे समजते .. आम्ही प्रशासनाच्या संपर्कात आहोत..कुठे कुठे नुकसान झाले आहे याचीही माहिती घेत आहोत .. सरकार कडून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी सगळे प्रयत्न करू हा विश्वास जनतेला देतो !”