*कोकण Express*
*जि. प. अध्यक्षांकडून आचरा, देवबागला भेट ; नुकसानग्रस्त भागाचा आढावा*
तोक्ते चक्रीवादळमुळे मालवण तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. संजना सावंत यांनी सोमवारी मालवणला भेट दिली. यावेळी देवबाग, आचरा येथील नुकसानीची त्यांनी पाहणी केली. यावेळी मालवण सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती राजू परुळेकर हे देखील उपस्थित होते.
यावेळी जि. प. अध्यक्षांनी देवबागमध्ये ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेत पिण्याच्या पाण्याचे टँकर, ताडपत्री पुरवठा तसेच वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी योग्य त्या सूचना केल्या. आचरा जामडूल येथे तीन मीटर उंचीचा संरक्षक बंधारा मंजूर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. नुकसानीचे पंचनामे त्वरित करण्यात यावे, असेही तहसीलदार यांना सूचित करण्यात आले. यावेळी गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, सहायक गटविकास अधिकारी श्याम चव्हाण, विस्तार अधिकारी व्ही.के .जाधव, ग्रामसेवक गोसावी तसेच जिल्हापरिषद सदस्य जेरोन फर्नांडिस, पंचायत समिती सदस्या मधुरा चोपडेकर आदी उपस्थित होते.