*कोकण Express*
*सकल मराठा समाजातर्फे रक्तदान शिबीर संपन्न!*
*कणकवली ः प्रतिनिधी (संजना हळदिवे)*
सकल मराठा समाज कणकवली आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, कणकवली यांच्या संयुक्त विद्यमान रक्तदान शिबीर आज शनिवार दिनांक १५ मे रोजी मराठा मंडळ हॉल, कणकवली येथे आयोजित केले होते. रक्तदान शिबीरामध्ये उत्साहाने सहभागी घेऊन चाळीस रक्तदात्यांनी रक्तदान केले. तर शिबिराचे उद्घाटन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून करण्यात आला.
यावेळी सकल मराठा समाजाचे महेंद्र सांबरेकर, तेजस राणे, धनंजय सावंत, बबलू सावंत, सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश तेंडोलकर, अमेय मडव, सुशिल सावंत, सोनू सावंत, माजी उपनगराध्यक्ष किशोर राणे, नगरसेविका सौ कविता राणे, संदीप राणे, बच्चू प्रभुगावकर, सर्वेश राणे, संतोष राणे, समीर सावंत, महेंद्र गावकर, महेश राणे, सुशिल परब, साक्षी परब, महेश सावंत आदी उपस्थित होते. तसेच शासनाच्या कोव्हिडं प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून हे रक्तदान शिबिर घेण्यात आले.

