कणकवली बाजारात आज देखील गर्दीची जत्रा

कणकवली बाजारात आज देखील गर्दीची जत्रा

*कोकण Express*

*कणकवली बाजारात आज देखील गर्दीची जत्रा*

*शहरात कोरोनाचा कहर सातत्याने वाढताच!*

*यापुढेतरी ठोस उपाययोजना राबविण्याची गरज!*

*कणकवली ः प्रतिनिधी (संजना हळदिवे)

कणकवली बाजारात शनिवारी देखील गर्दीची जत्रा झाली होती. शुक्रवारच्या तुलनेत आज शनिवारी बाजारात विक्रेत्यांसह ग्राहकांची संख्या जास्तच दिसून येत होती. गेले दोन दिवस गजबजलेली कणकवलीची बाजारपेठ पाहता मागील काही दिवसांचा जनता कर्फ्यु बिनकामाचा ठरेल आणि कोरोनाचा उद्रेक आणखीन वाढेल, अशी भिती सुजाण नागरिकांमधून होत आहे. कोरोनाचा कहर सातत्याने वाढतच असल्याने कणकवली शहरात दहा दिवसीय जनता कर्फ्यु राबविण्यात आला. पुढील काही दिवस जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या कडक लॉकडाऊनमध्येही शहर सहभागी होते. मात्र, १४ मेपासून मिळालेल्या नियम शिथिलतेचा फायदा उचलत विक्रेते, ग्राहकांनी पुन्हा एकदा कणकवली गजबजून सोडली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!