*कोकण Express*
*पटवर्धन चौकात चौघांचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह*
*पॉझिटिव्ह मिळणार्या रुग्णांची संख्या नित्याची!*
*शहरातील तीन तर शेजारील गावातील एकाचा समावेश!*
*कणकवली ः प्रतिनिधी (संजना हळदिवे)
कणकवली पटवर्धन चौकात आरोग्य विभागामार्फत करण्यात येणाऱ्या रॅपिड टेस्टमध्ये पॉझिटिव्ह मिळणार्या रुग्णांची संख्या आता नित्याचे झाले आहे. कणकवली शहरात वाढलेली वर्दळ व त्यामुळे कोरोनाचा होत असलेला प्रसार हा भविष्यात रुग्ण वाढीच्या दृष्टीने धोकादायक बनला आहे.
आज शनिवारी दुपारपर्यंतच्या सत्रात कणकवली पटवर्धन चौकात चार जणांचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले. यात कणकवली सोनगेवाडी मधील 50 वर्षीय पुरुष, 45 वर्षीय महिला व 20 वर्षीय मुलीचा समावेश आहे. तर कलमठ सुतारवाडी मधील एका 23 वर्षीय युवती अशा चार जणांचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले.
पटवर्धन चौकात कार्यरत असलेल्या आरोग्य पथकामध्ये तालुका आरोग्य समूह संघटक निखिल जाधव, समुदाय आरोग्य अधिकारी तेजस्वी पारकर, लक्ष्मण दळवी, दिनेश जाधव यांचा समावेश आहे . तर कणकवली पटवर्धन चौकात वाहतूक पोलिस संदेश आबिटकर, होमगार्ड सुमित वारंग, शिवप्रसाद मगदूम हे कार्यरत आहेत.

