*कोकण Express*
*कणकवली पोलिसांची जेमिनी क्राफ्ट बोटीसह रंगीत तालीम!*
*पोलीस निरीक्षक अजमुद्दीन मुल्ला यांच्या नेतृत्वाखाली वरवडे नदीपात्रात प्रात्यक्षिक!*
*पोलीस विभागाकडून जनेतेला दक्षतेचे आवाहन!*
*कणकवली ः प्रतिनिधी (संजना हळदिवे)*
तौक्ते वादळाच्या
संभाव्य नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी पोलीस निरीक्षक अजमुद्दीन मुल्ला यांच्या नेतृत्वाखाली कणकवली पोलिस सज्ज असून पोलिसांनी या नैसर्गिक आपत्तीशी दोन हात करण्याच्या दृष्टीने विशेष तयारी केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून कणकवली पोलिस
स्टेशनच्या पोलिसांनी कणकवली वरवडे येथील नदीपात्रात जेमिनी क्राफ्ट बोटीसह बचावकार्याची रंगीत तालीम घेतली. या रंगीत तालीमेत कणकवली पोलिस स्टेशनचे अधिकारी, पोलीस कर्मचारी व होमगार्ड सहभागी झाले होते. पोलीस निरीक्षक अजमुद्दिन
मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रात्यक्षिक करण्यात आले.तसेच नागरिकांनी ही या वादळाचा धोका लक्षात घेता दक्ष राहण्याचे आवाहन ही पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.