*कोकण Express*
*जिल्ह्यात अविरत सेवा देत असलेल्या बी. ए.एम. एस . डॉक्टरांना आरोग्य सेवेतून हलवू नये.*
*संजना सावंत अध्यक्ष जिल्हा परिषद सिंधुदुर्ग.*
*सिंधुदुर्ग*
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आरोग्य विभागा अंतर्गत वैद्यकीय आरोग्य अधिकारी गट अ ही पदे गेली अनेक वर्ष एमबीबीएस डॉक्टर न मिळाल्याने रिक्त आहेत. परंतु अशा प्रतिकूल परिस्थितीत जिल्ह्यातील एमबीबीएस डॉक्टर यांची सदर रिक्त पदी कंत्राटी पद्धतीने बी. ए. एम .एस .डॉक्टर यांची नियुक्ती केलेली आहे. या वैद्यकीय अधिकारी यांनी कोरोना सारख्या महाभयंकर साथ रोगाने आरोग्य यंत्रणा पोखरलेली असताना देखील स्वतः कार्यरत राहून या आरोग्य यंत्रणेला स्वतःच्या कामाने अल्प मानधनात मोलाची साथ दिली. कोरोना च्या पहिल्या लाटेत जिल्ह्यात ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर रुग्णांचा अतिरिक्त भार असतानादेखील आरोग्य यंत्रणेचे कामकाज प्रभावीपणे चालू ठेवले. पहिल्या व दुसऱ्या लाटेत खाजगी वैद्यकीय सेवा बंद असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरील डॉक्टर यंत्रणेवर याचा निश्चित भार पडलेला आहे. तरी आपल्या कामाने पहिल्या व दुसऱ्या लाटेत अजून पर्यंत ग्राम पातळीवरील आरोग्य यंत्रणा सक्षम पणे कार्यान्वित ठेवली आहे.
सद्यस्थितीत शासनस्तरावरून एमबीबीएस डॉक्टर जिल्ह्यासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहेत हि निश्चितच चांगली गोष्ट आहे .परंतु ज्या बी. ए. एम .एस. डॉक्टर यांनी कोरोना च्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत आरोग्य यंत्रणेला मोलाची साथ दिली त्यांना विसरून चालणार नाही.
त्यामुळे नव्याने एमबीबीएस डॉक्टर ची नियुक्ती करताना ती जिल्हा ग्रामीण रुग्णालय, तालुका ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरील रिक्त पदे यांचा विचार करून नियुक्ती करावी. सद्यस्थितीत बी. ए. एम. एस .डॉक्टर कार्यरत असलेली प्राथमिक आरोग्य केंद्रावर त्यांची नियुक्ती पूर्वीप्रमाणेच कार्यान्वित ठेवावी अशी मागणी संजना सावंत यांनी आज जिल्हाधिकारी यांचे दालनात माननीय पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत केली. अध्यक्ष संजना सावंत यांची मागणी रास्त असल्याचे सांगत पालक मंत्री श्री उदय सामंत यांनी जिल्हा डॉक्टर यांची नव्याने नियुक्ती करताना या पूर्वी कार्यरत कंत्राटी बी. ए. एम. एस. डॉक्टर यांना हलवण्यात येणार नाही असे स्पष्टपणे सांगितले.सिंधुदुर्ग जिल्ह्यात सद्यस्थितीत एकूण 40 बी. ए. एम .एस. वैद्यकीय अधिकारी गट अ या पदावर कंत्राटी पद्धतीने कार्यरत आहेत.