*कोकण Express*
*महामार्गालगत उभ्या टेम्पो ट्रॅव्हलर्सला आग लागून झाले मोठे नुकसान!*
*नगरपंचायतच्या अग्निशामक बंबाने आग आणली आटोक्यात; शॉर्टसर्किटने आग लागल्याची शक्यता!*
*कणकवली ः प्रतिनिधी*
महामार्गालगत उभ्या असलेल्या टेम्पो ट्रॅव्हलर्सला आग लागून टेम्पो ट्रॅव्हलरचे मोठे नुकसान झाले. टेम्पो ट्रॅव्हलरच्या समोरील भागातून शुक्रवारी दुपारी धूर येऊ लागल्याने ग्रामस्थांनी धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत टेम्पो ट्रॅव्हलर च्या केबिन मध्ये आगीने घेतला होता. त्यानंतर तातडीने कणकवली नगरपंचायत अग्निशामक बंबाला पाचारण करण्यात आले. तोपर्यंत टेम्पो ट्रॅव्हलरचा समोरील भाग आगीच्या भक्ष्यस्थानी पडला होता. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही घटना महामार्गावर साकेडी फाट्याजवळ आज शुक्रवारी दुपारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडली. घटनेनंतर जानवली येथील सामाजिक कार्यकर्ते संदीप सावंत आणि ग्रामस्थांनी धाव घेत मदत कार्य केले.
उपलब्ध माहितीनुसार टेम्पो ट्रॅव्हलर्स तेथील गॅरेजमध्ये काम करण्यासाठी उभी करून ठेवण्यात आली होती असे सांगण्यात आले. वरवडे येथील एका युवकांची ही गाडी असल्याचे समजते. नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी या गाडीला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवत गाडीच्या उर्वरित भागाचे होणारे नुकसान वाचवले.