*कोकण Express*
*कुडाळ मनसेच्या माध्यमातून शहरातील वर्दळीच्या ठिकाणी निर्जंतुकीकरण*
मनसेच्या माध्यमातून कुडाळ शहरातील परिसर शासकीय हॉस्पिटल पोलीस स्टेशन,अशा ठिकाणी आज निर्जंतुकीकरण करण्यात आले. मनसेचे एसटी कामगार सेनेचे राज्य उपाध्यक्ष बनी नाडकरणी यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवला. जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्या हस्ते जिजामाता चौकात या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी शहर अध्यक्ष सिद्धेश खुठाळे, उपतालुकाध्यक्ष जगन्नाथ गावडे, कुडाळ शहर सचिव रमा नाईक,प्रथमेश धुरी,सिद्धांत बांदेकर अनिकेत घाडी,समीर वाळके आदी उपस्थित होते.संबंधित कार्यक्रमास कुडाळ तालुका व्यापारी संघटना अध्यक्ष श्रीराम शिरसाठ यांनी शुभेच्छा देऊन उपक्रमाचे कौतुक केले.