शिडवणे उपकेंद्र येथे कोविड लसिकरणाला सुरवात

शिडवणे उपकेंद्र येथे कोविड लसिकरणाला सुरवात

*कोकण Express*

*शिडवणे उपकेंद्र येथे कोविड लसिकरणाला सुरवात*

*शिडवणे उपकेंद्र येथे कोविड लसिकरणाला सुरवात*

*खारेपाटण ः  प्रतिनिधी*

कणकवली तालुक्यातील खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या शिडवणे या गावी येथील उपकेंद्रात कोविड लसिकरण केंद्राचा शुभारंभ गुरुवार दि.१३ मे २०२१ पासून जि. प. सिधुदुर्गचे माजी बांधकाम व वित्त सभापती रवींद्र उर्फ बाळा जठार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. जिल्ह्यातील प्रा. आ. केंद्रावर लसिकरणसाठी होणारी गर्दी तसेच तसेच जेष्ठ व वृद्ध महिला नागरिकांना लसिकरणासाठी रांगेत उभे राहून होणारा त्रास व लसीचे योग्य नियोजन व्हावे आणि सर्व नगरिकांना कोविड लस मिळावी या उद्देशाने जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने यापुढे प्रत्येक उपकेंद्रावर कोविड लसिकरण केंद्र सुरू केले असून कणकवली तालुक्यातील शिडवणे उपकेंद्रात देखील कोरोना प्रतीबंधक लस नागरिकांना देण्यात आली. या उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या वारगाव, साळीस्ते व शिडवणे या गावातील सुमारे १८६ नागरिकांनी आजपर्यंत कोविड लसीचा लाभ घेतला.
सिंधुदुर्ग जि. प. चे माजी बांधकाम व वित्त सभापती रवींद्र उर्फ बाळा जठार यांनी देखील शिडवणे उपकेंद्रावरच कोविड लस टोचून घेत सर्व नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस लवकरात लवकर टोचून घ्यावी असे आवाहन केले. तर शिडवणे उपकेंद्र येथील लसिकरण केंद्रावर खारेपाटण प्रा.आ. केंद्राच्या आशा स्वयंसेविका गतप्रवर्तक सौ. संकिता पाटणकर, आरोग्य सहाय्यिका अर्चना किर्लोस्कर, मंजिरी बावकर, तसेच आशा स्वयंसेविका – दिया ताम्हणकर, रचना शेट्ये, शीतल जाधव, आरती शिंदे, व दीपाली शेट्ये इत्यादी आरोग्य विभागाचे कर्मचारी प्रामाणिकपणे काम करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!