*कोकण Express*
*कै.सिताराम (आबा) सखाराम तर्फे सर स्मृती चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने पाच गावांना आॅक्सिमीटर व थर्मलगणचे वाटप-श्री वामन तर्फे*
जांभवडे बामणवाडी ता.कुडाळ येथील सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे कै.सिताराम सखाराम तर्फे सर यांचे कार्य पुढे चालू ठेवण्यासाठी समस्त तर्फे परिवाराने स्थापन केलेल्या कै.सिताराम (आबा) सखाराम तर्फे स्मृती चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने जांभवडे पंचक्रोशीतील पाच गावांना एक-एक आॅक्सिमीटर व थर्मलगणचे वाटप करण्यात आले.सध्या या पंचक्रोशीतील रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.ताप व कोरोना सदृश्य लक्षणे असलेले नागरिक भीतीने डाॅक्टरकडे जाण्यास घाबरतात.संशयित रुग्णांपर्यंत पोहचण्यासाठी पंचक्रोशीत कोविड योद्धा मित्र ग्रुपची स्थापना करण्यात आली असून सदर ग्रुपमधील स्वयंसेवकांना आवश्यकती साधनसामग्री उपलब्ध करून देण्यासाठी ट्रस्टच्यावतीने ही उपकरणे देण्यात आली.२०१६पासून ट्रस्टच्या माध्यमातून अध्यक्षा श्रीमती शिल्पा तर्फे यांच्या नेतृत्वाखालील विविध शैक्षणिक व आरोग्यविषयक उपक्रम राबविण्यात येत आहेत.यावेळी डाॅ.प्रशांत मडव,ट्रस्टचे सचिव श्री वामन तर्फे,विश्वस्त शैलेश तर्फे, संजय तर्फे, शिवाजी मडव, पंचायत समिती सदस्य श्री बाळकृष्ण मडव,घोटगे सरपंच श्री अमोल तेली, दिलीप कदम, सुहास गुरव, अमोल मडव,पप्पु तेजम,नयन मडव उपस्थित होते.
जांभवडे पंचक्रोशीतील रुग्णांना मदत करण्यासाठी पंचक्रोशीतील शिक्षकांनी एकत्र येऊन ग्रुप स्थापन केला असुन या ग्रुपच्या नेतृत्वाखाली कोविड 19 योद्धा मित्र ग्रुप कार्यरत राहणार आहे.पंचक्ररोशीची गरज लक्षात घेता भविष्यात देणगी दारांच्या माध्यमातून एक कायमस्वरूपी अॅम्बुलन्स व आॅक्सिजन काॅन्सेन्ट्रेटर उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे.यावेळी श्री.दिलीप कदम यांनी ट्रस्टचे व उपस्थितांचे आभार मानले.