*कोकण Express*
*रोजगारासाठी गोवा जाणा-या युवक युवतींची अडवणूक करू नये–गुरूदास गवंडे*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
गोव्यात जाणारे युवक युवती रोजगारासाठी गोवा राज्यात जात आहेत त्यांची पत्रादेवी याठिकाणी अडवणूक केली जात आहे हे पूर्णतः चुकीचे आहे गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. श्री.प्रमोद सावंत यांनी यावर सकारात्मक तोडगा काढावा सर्व सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबातून रोजगारासाठी लोक गोव्यात जात आहेत त्याची गोवा सरकारने दखल घ्यावी गोवा राज्याला रस्त्यासाठी लागणारी खडी वाहतूक सिंधुदुर्गातून जाते त्यामुळेच गोवा राज्याचा विकासाला चालना व गती मिळते आज शेजारील मोपा एअरपोर्ट असू दे अथवा पत्रादेवी मडगाव हायवे असू दे लागणारा दगड, खडी ही सावंतवाडी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातून पुरवली जाते त्याप्रमाणे कामाला जाणारे नोकरदार वर्ग आहे हे राज्य सरकारने घातलेल्या अटीनुसार गोव्याला जात आहे ज्या कंपनीमध्ये ही मुलं कामाला जातात त्या कंपनीच्या अटी शर्ती राहून काम करतात त्यामुळे त्यांना कोरोना टेस्ट करणे बंधनकारक आहे असे बोलणे चुकीचे आहे त्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांनी ज्याप्रमाणे सिंधुदुर्ग व गोवा राज्य यांचे अतूट नाते आहे ते कायमस्वरूपी असेच राहावे ही आमची मागणी आहे खरोखर गोवा राज्याच्या मुख्यमंत्र्यांच मी अभिनंदन करतो की त्यांनी आपल्यावर टीका होऊनही सिंधुदुर्गला ऑक्सिजन पुरवठा केला त्याच प्रमाणे येथील मुलांचा रोजगाराचा प्रश्न आहे तो त्याने निकाली काढावा व सहकार्य करावे ही विनंती ही आमची भावना आहे.