माणगाव प्रा.आ.केंद्रासाठी दिलेल्या नवीन रुग्णवाहिकेचे लोकार्पण

माणगाव प्रा.आ.केंद्रासाठी दिलेल्या नवीन रुग्णवाहिकेचे लोकार्पण

*कोकण Express*

*माणगाव प्रा.आ.केंद्रासाठी दिलेल्या नवीन रुग्णवाहिकेचे लोकार्पण…*

*कुडाळ ः प्रतिनिधी*

आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतुन माणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी नवीन रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात आली असून आज या रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. माणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी रुग्णवाहिका देण्याचा शब्द आ. वैभव नाईक यांनी पूर्ण केला आहे.त्यामुळे रूग्णांना याचा लाभ होणार आहे. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य राजू कवीटकर,पंचायत समिती सदस्य सौ मथुरा राऊळ,शिवसेना तालुका संघटक बबन बोबाटे, युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी,शिवसेना उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी,विभागप्रमुख अजित करमळकर,उपविभाग प्रमुख बापू बागवे,हुमरस सरपंच अनुप नाईक,वाडोस उपसरपंच संतोष देसाई,बंड्या कुडतरकर, संजय धुरी,माजी उपविभाग प्रमुख रमाकांत धुरी,ज्ञानबा कुडतरकर,शैलेश विर्नोडकर,राजन सावंत आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!