कणकवलीतील अत्यावश्यक सेवेतील दुकाने १४ मे पासून सुरू ठेवता येणार

कणकवलीतील अत्यावश्यक सेवेतील दुकाने १४ मे पासून सुरू ठेवता येणार

*कोकण Express*

*कणकवलीतील अत्यावश्यक सेवेतील दुकाने १४ मे पासून सुरू ठेवता येणार*

 *नियमांचे पालन करणे सक्तीचे असणार*

*नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे आवाहन*

*कणकवली ः प्रतिनिधी (संजना हळदिवे)*

कणकवली शहरात १ मे पासून जनता कर्फ्यू लागू करण्यात आलेला होता. त्यानंतर प्रशासनाकडून पाच दिवसांचे लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. कणकवलीतील व्यापारी व नागरिकांनी लॉकडाऊन जाहीर होण्याच्या अगोदरच जनता कर्फ्यू काटेकोर पाळल्याने १४ मे पासून कणकवली शहरातील अत्यावश्यक सेवेतील नियमा नुसार मुभा असलेली दुकाने सकाळी सात ते दुपारी अकरा वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली. यासंदर्भात लॉकडाउन जाहीर करण्यापूर्वी चर्चा करण्यात आली होती. त्या चर्चेनुसार कणकवलीकरांना ही सूट देण्यात आली होती. १ मे पासून जनता कर्फ्यू च्या माध्यमातून कणकवलीतील व्यापारी, नागरिक व विविध स्वयंसेवी संस्था, संघटना यांनी जनता कर्फ्यू यशस्वी केल्याबद्दल नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी या सर्वांचे आभार मानले आहेत. तसेच प्रशासनातील अधिकारी, पोलीस, आरोग्य,महसूल विभाग यांनीही दिलेल्या योगदानाबद्दल श्री नलावडे यांनी समाधान व्यक्त केले आहे.१४ मे पासून जरी दुकाने सुरू केली तरी जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाप्रमाणे अत्यावश्यक सेवेत नमूद केलेली दुकाने सकाळी सात ते अकरा या वेळेत सुरू ठेवता येणार आहेत. ज्या दुकानांना सुरू ठेवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी मुभा दिलेली नाही ती दुकाने सुरु करता येणार नाहीत. तसेच या सुरू करण्यात येणाऱ्या दुकानदार व व्यापाऱ्यांनी देखील सोशल डिस्टंसिंग, मास्क, सॅनिटायझर चा वापर करून या सर्व नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. असेही आवाहन श्री नलावडे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!