*कोकण Express*
*फोंडाघाट प्राथमिक आरोग्य केंद्रात कोव्हॉक्सिन लस उपलब्ध करा*
*सभापती मनोज रावराणे यांनी वेधले आमदार नितेश राणे यांचे लक्ष*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली तालूक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र फोंडाघाट या ठीकाणचे लसीकरण सुरू झाल्यापासून कोव्हीशील्ड लसीचाच पूरवठा होत होता . त्यानुसार ४५ वर्षावरील नागरीक व जेष्ठ नागरीकांचे काही प्रमाणात लसीकरण पूर्णही झालेले आहे . लसीकरण सुरू झाल्यापासून ७ एप्रिल २०२१ ते ९ एप्रिल २०२१ या कालावधीत केवळ एकदाच ३०० कोव्हॅक्सीन या लसचा पूरवठा करणेत आलेला होता . पहील्या डोसनंतर नियमानुसार २८ दिवसांच्या कालावधीनंरत दुसरा डोस घेणे क्रमप्राप्त होते . परंतू फोंडाघाट प्राथ.आरोग्य केंद्रास अदयाप ३०० कोव्हॅक्सीन लसीच्या दूसरा डोससाठी कोव्हॅक्सीन लस प्राप्त झालेली नाही . तरी यापूर्वी ज्या जेष्ठ नागरीकांनी कोव्हॅक्सीन लस घेतलेली आहे , त्यांना आता दुसरी लस देताना यापूर्वी घेतलेली ३०० कोव्हॅक्सीन लसीचाच पूरवठा प्राधान्याने करणेत यावा अशी मागणी सभापती मनोज रावराणे यांनी आमदार नितेश राणे यांच्यासह प्रशासनाकडे केली आहे. जेणेकरून यापूर्वी कोव्हॅक्सीन घेतलेल्या व्यक्तींना त्यांचा दूसरा डोस वेळेत घेणे शक्य होईल . तरी वरील नमुद बाबींचा विचार करून त्याप्रमाणे कोव्हॅक्सीन लसींचा पूरवठा वेळेत व्हावा अशी मागणी सभापती मनोज रावराणे यांनी आमदार नितेश राणे जिल्हाधिकारी जिल्हा परिषद अध्यक्ष व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

