मनोज आणि अजय रावराणे बंधूंनी जपली सामाजिक बांधिलकी

मनोज आणि अजय रावराणे बंधूंनी जपली सामाजिक बांधिलकी

*कोकण  Express*

*मनोज आणि अजय रावराणे बंधूंनी जपली सामाजिक बांधिलकी*

*फोंडाघाट प्रा.आरोग्य केंद्रात बांधला मंडप*

*लसीकरण साठी येणाऱ्यांना बैठकीसह बिस्कीट पाण्याची केली व्यवस्था*

*कणकवली  ः  प्रतिनिधी*

कणकवली पं. स. चे माजी उपसभापती तुळशीदास रावराणे यांचे सुपुत्र असलेले कणकवली पं. स. चे विद्यमान सभापती मनोज रावराणे यांनी व लोरे गावचे सरपंच अजय रावराणे यांनी स्वखर्चाने ने फोंडाघाट प्राथमिक आरोग्य केंद्रात मंडप घालून लसीकरण साठी येणाऱ्या ग्रामस्थांना सावलीची सोय निर्माण केली आहे. वडील तुळशीदास रावराणे यांच्याकडून सामजिक भान आणि जाण याचा वारसा घेतलेल्या मनोज आणि अजय या बंधू वडिलांच्या मार्गगदर्शनाखाली आपली सामाजिक जडणघडण कायम वृद्धिंगत करत आहेत. राजकारणाच्या पलीकडे जाऊन समाजकारण फार महत्वाचे असते. समाजकारणातूनच तुमच्या व्यक्तिमत्वाची कायमस्वरूपी छाप जनमाणसावर उमटत असते. याचीच जाणीव ठेवून पं. स. सभापती मनोज रावराणे आजी लोरे नं. 1 गावचे विद्यमान युवा सरपंच अजय रावराणे हे नेहमीच पंचक्रोशीत विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात. कोव्हीड काळात सध्या लसीकरणासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रावर मोठ्या प्रमाणत गर्दी होत आहे. फोंडाघाट प्रा. आरोग्य केंद्रामध्येही लगतच्या कार्यक्षेत्रातील गावातील शेकडो लोक लसीकरणसाठी येतात. मात्र त्यांना लसीकरणाची वाट पाहत उन्हात उभे राहावे लागत असे. सभापती मनोज रावराणे यांच्या ध्यानात ही बाब येताच तात्काळ त्यांनी फोंडाघाट प्राथमिक आरोग्य केंद्रात मंडप उभारून, खुर्च्या उपलब्ध करून देत ग्रामस्थाना सावलीची आणि बैठकीची सोय केली. लोरे नं. चे सरपंच अजय रावराणे हे दररोज लसीकरण दिवशी स्वतः जातिनिशी फोंडाघाट प्राथमिक आरोग्य केंद्रात आपल्या सहकाऱ्यांसह जातात. लसीकरणसाठी आलेल्या प्रत्येक नागरिकाला बिस्कीट पुडा आणि अर्धा लिटर पाणी बाटलीचे वाटप करतात. एवढेच नव्हे तर सरपंच अजय रावराणे यांनी लोरे नं. 1 गावातून कोव्हीड लसीकरणसाठी फोंडाघाट येथे जाणाऱ्या ग्रामस्थांना मोफत प्रवासाची सोय स्वखर्चाने केली आहे. त्यासाठी स्वतंत्र गाडीची तजवीज केली आहे. रावराणे बंधूंच्या हा समाजकार्याची चर्चा सध्या फोंडाघाट दशक्रोशीतून होत आहे. रावराणे बंधूंना पं. स. सदस्या सुजाता हळदीवे – राणे, भाजपा उपजिल्हाध्यक्ष राजन चिके, फोंडाघाट सरपंच संतोष आग्रे, विश्वनाथ गुरव, नरेश गुरव, सुमन गुरव यांचेही सहकार्य लाभत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!