सिंधुदुर्गात जिल्ह्यात नव्याने ६७२ पॉझिटिव्ह

सिंधुदुर्गात जिल्ह्यात नव्याने ६७२ पॉझिटिव्ह

*कोकण Express*

*सिंधुदुर्गात जिल्ह्यात नव्याने ६७२ पॉझिटिव्ह*

*आज १५ व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू…*

डॉ.श्रीपाद पाटील ; ५ हजार ५३७ *सक्रिय रुग्ण…*

*सिंधुदुर्गनगरी,ता.१२*

जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण १२ हजार २६१ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ५ हजार ५३७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ६७२ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

मृतांमध्ये पेडूर-मालवण येथील ४७ वर्षीय महिला आहे. तिला उच्चरक्तदाबाचा त्रास होता. परुळे-वेंगुर्ला येथील ५६ वर्षीय पुरुष आहे. त्याला यकृतविकार व मधुमेहाचा त्रास होता. डिगस-कुडाळ येथील ७५ वर्षीय पुरुष आहे. त्याला ह्दयरोगाचा त्रास होता. वळिवंडे-देवगड येथील ७० वर्षीय महिला आहे. तिला मधुमेह उच्च रक्तदाबाचा त्रास होता. बेलाचीवाडी-मालवण येथील १६ वर्षीय महिला आहे. तिला मनोविकाराचा त्रास होता. नाटळ-कणकवली येथील ६२ वर्षीय पुरुष आहे. त्याला ह्दयरोगाचा त्रास होता. बांदा-सावंतवाडी येथील ३४ वर्षीय पुरुष आहे. त्याला ॲनिमियाचा त्रास होता. पिंगुळी-कुडाळ येथील ४० वर्षीय पुरुष आहे. त्याला रक्तविकाराचा त्रास होता. सावंतवाडी येथील ८1 वर्षीय महिला आहे. तिला उच्चरक्तदाब,फुफुसविकाराचा त्रास होता. उभादांडा-वेंगुर्ला येथील ७५ वर्षीय महिला आहे. तिला ह्दयरोगाचा त्रास होता. ओरोस-कुडाळ येथील ४२ वर्षीय पुरुष आहे. त्याला यकृतविकाराचा त्रास होता. वागदे-कणकवली येथील ७२ वर्षीय पुरुष आहे. त्याला उच्चरक्तदाबाचा त्रास होता. उभादांडा-वेंगुर्ला येथील ६५ वर्षीय पुरुष आहे. त्याला उच्चरक्तदाबाचा त्रास होता. माजगाव-सावंतवाडी येथील ५४ वर्षीय पुरुष आहे. त्याला फुफुसविकाराचा त्रास होता. आकेरी-सावंतवाडी येथील ७२ वर्षीय महिला आहे. तिला ह्दयरोगाचा त्रास होता. दरम्यान १५ जणांचा मृत्यू जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!