जांभवडे पंचक्रोशीत कोविड १९योद्धा ; मित्र ग्रुप स्थापन

जांभवडे पंचक्रोशीत कोविड १९योद्धा ; मित्र ग्रुप स्थापन

*कोकण  Express*

*जांभवडे पंचक्रोशीत कोविड १९योद्धा ; मित्र ग्रुप स्थापन*

जांभवडे पंचक्रोशीत कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे.अशातच कोरोना बाधित4 रुग्णांना किंवा संशयितांना रुग्णालयापर्यंत जाण्यासाठी वाहतूक व्यवस्था होत नाही.काहीना आर्थिक परिस्थितीमुळे अडचणी येत आहेत.काही नागरिक भीतीने आजारपण अंगावर काढत आहेत.तर काही टेस्ट करायला घाबरत आहेत.यामुळे कोरोना प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.अंदाजे ७०%लोकांचे लसीकरण झालेलेच नाही.या सर्व परिस्थितीचा विचार करून पंचक्रोशीतील गरजु रुग्णांना मदत करण्यासाठी एकत्र येऊन कोविड 19 योद्धा मित्र ग्रुपची स्थापना करण्यात आली असून या ग्रुपच्या माध्यमातून कोरोना बाधित रुग्णांना मदत करण्यास सुरुवात केली आहे.या ग्रुपच्या माध्यमातून आर्थिक दृष्ट्या सक्षम नसलेल्या गरजू रुग्णांना कोविड सेंटर पर्यंत नेण्यासाठी वाहतूक व्यवस्था करणे, डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधपुरवठा करणे, आवश्यकतेनुसार थर्मलगण व आॅक्सिमीटर उपलब्ध करून देणे, जनजागृती करुन लोकांच्या मनातील भिती घालवणे,कोरोनाचि फैलाव होऊ नये म्हणून योग्यती खबरदारी घेण्यास प्रवृत्त करणे ही कामे करण्यात येणार आहेत.
या कार्यासाठी डॉ.प्रशांत मडव,श्री.वामन तर्फे,श्री.दिलीप कदम,श्री.धोंडु रेडकर,श्री.शिवाजी मडव,श्री अमोल तेली, अॅड.विशाल मडव,श्री.बुधाजी घाडीगांवकर,श्री.सुनिल गांवकर,श्री.रविकांत मेस्त्री,श्री.विष्णु परब,श्री.किशोर तांबे,श्री.भावेश परब यांनी पुढाकार घेतला आहे.
सदर ग्रुपमध्ये स्थानिक पातळीवर काम करण्यासाठी श्री.अमित मडव,श्री.नयन मडव,श्री.शैलेश तर्फे व त्यांचे सर्व सहकारी कार्यरत राहणार आहेत.या ग्रुपचे सर्व कामकाज जांभवडे पंचक्रोशी शिक्षक ग्रुप व जांभवडे पंचक्रोशी रहिवाशी मित्र मंडळ कणकवलीच्या सल्ल्याने चालणार असून संपुर्ण सहकार्य असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!