*कोकण Express*
*कणकवलीत पोलिसांकडून दुचाकीस्वारांवर धडक कारवाई*
*वर्दळ कमी करण्यासाठी पोलिस रस्त्यावर!*
*कणकवली ः प्रतिनिधी*
लॉकडाऊन असतानादेखील महामार्ग तथा शहरातील रस्त्यावरील वर्दळ कमी होत नसल्याने, अखेर कणकवली पोलिसांनी दुचाकीस्वारांवर कारवाई सुरू केली आहे.
कणकवली पोलिस निरीक्षक अजमुद्दिन मुल्ला हे स्वतः कारवाईसाठी रस्त्यावर उतरल्याने कणकवली शहरात आज सकाळपासूनच पोलिसांकडून लॉकडाऊन ची कडक अंमलबजावणी सुरू करण्यात आली. यात विनाकारण फिरणाऱ्याना कारवाईचा दणका देत असतानाच काही वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई देखील करण्यात आली.
कणकवली पटवर्धन चौकात पोलिसांनी सुरू केलेल्या या कारवाईमुळे वाहन चालकांची मात्र, भंबेरी उडत होती. या कारवाईत पोलीस निरीक्षक अजमुद्दिन मुल्ला यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे, वाहतूक पोलीस प्रकाश गवस, संदेश आंबिटकर, श्री पाटील व होमगार्ड सहभागी झाले आहेत.

