सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३४१ नवे पॉझिटिव्ह रूग्ण

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३४१ नवे पॉझिटिव्ह रूग्ण

*कोकण Express*

*सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३४१ नवे पॉझिटिव्ह रूग्ण..*

*कोरोनामुळे आणखी बारा जणांचा मृत्यू ; ५ हजार १२० रुग्णांवर जिल्ह्यात उपचार सुरू…*

*सिंधुदुर्गनगरी,ता.११:*

जिल्ह्यात आज कोरोनामुळे तब्बल १२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आणखी ३४1 व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. आतापर्यंत १२ हजार २९ रुग्ण कोरोना मुक्त झाले. तर आज अखेर ५ हजार १२० रुग्णांवर जिल्ह्यात उपचार सुरू आहेत. याबाबतची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक श्रीपाद पाटील यांनी दिली.

मृतांमध्ये ओवळीये-मालवण येथील ८२ वर्षीय पुरुष आहे.त्याला हृदयरोग,उच्चरक्तदाबाचा त्रास होता. सावंतवाडी येथील ५६ वर्षीय पुरुष आहे.त्याला किडनीविकार,मधुमेहाचा त्रास होता.भोयीचे केरवडे-कुडाळ येथील ८२ वर्षीय पुरुष आहे.त्याला मधुमेह,हृदयरोगाचा त्रास होता. सरंबळ-कुडाळ येथील ७६ वर्षीय पुरुष आहे.त्याला मधुमेह, पक्षाघाताचा त्रास होता. बागायत-मालवण येथील ५५ वर्षीय पुरुष आहे.त्याला उच्चरक्तदाबाचा त्रास होता. पडेल-देवगड येथील ८२ वर्षीय महिला आहे.तिला हृदयरोगाचा त्रास होता.धुरीवाडा-मालवण येथील ५९ वर्षीय पुरुष आहे.त्याला उच्चरक्तदाबाचा त्रास होता. सौंदाळे-देवगड येथील ७० वर्षीय पुरुष आहे.त्याला हृदयरोग, उच्चरक्तदाबाचा त्रास होता.खारेपाटण-कणकवली येथील ५४ वर्षीय पुरुष आहे.त्याला उच्चरक्तदाबाचा त्रास होता.भरड-मालवण येथील ७६ वर्षीय पुरुष आहे.त्याला हृदयरोग,उच्चरक्तदाबाचा त्रास होता. शिरवल-कणकवली येथील ६० वर्षीय महिला आहे.तिला उच्चरक्तदाबाचा त्रास होता. चौकुळ-सावंतवाडी येथील ५६ वर्षीय पुरुष आहे.त्याला हृदयरोगाचा त्रास होता. दरम्यान १२ जणांचा मृत्यू जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!