*कोकण Express*
*गोव्याचे मुख्यमंत्री कोरोना रोखण्यासाठी स्वतः पीपीई कीट घालून मैदानात…*
*कोविड केंद्राला दिली भेट ; ऑक्सीजन अभावी रुग्णांचा मृत्यू होवू नये, यासाठी नियोजनाचे आश्वासन…*
*पणजी,ता.११:*
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे आज खुद्द आपण कोरोनाच्या विरोधातील लढाईसाठी मैदानात उरतले.यावेळी त्यांनी स्वतः पीपीई कीट घालून गॉमेकॉमधील कोविड सेंटरला भेट दिली. त्या ठिकाणी उपचार घेत असलेले रुग्ण तसेच त्यांच्या नातेवाईकांच्या समस्या जाणून घेतल्या. कदाचित आपण पहिला मुख्यमंत्री असेन ज्याने कोविड वॉर्डात जावून रुग्णांची भेट घेतली असेल,असा दावा त्यांनी यावेळी केला आहे. दरम्यान गोव्यातील एकाही रुग्णांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू होणार नाही. यासाठी योग्य ते नियोजन करण्यात येईल,ज्या समस्या आहेत त्या उद्यापर्यत सोडविण्यात येतील,असे आश्वासन गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी राज्याला दिले आहे. श्री. सावंत हे आज खुद्द कोरोनाच्या विरोधातील लढाईसाठी मैदानात उतरले.