*कोकण Express*
*त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा ; भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांची मागणी*
*कणकवली ः प्रतिनिधी*(संजना हळदिवे)
कणकवली तालुक्यातील ग्रामीण भागात कोव्हीड -19 च्या नियमांचे पालन करण्यात चालढकल होत आहे. जाणूनबुजून कोव्हीड च्या नियमांचा भंग करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांच्यासह शहराध्यक्ष अण्णा कोदे, नगरसेवक शिशिर परुळेकर यांनी तहसीलदारांकडे केली आहे. कणकवली शहरात कोव्हीड बाबत कडक नियमांचे पालन नगराध्यक्ष व नगरपंचायत प्रशासनाने अंमलात आणताच शहरात कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी होऊ लागले आहे. मात्र तालुक्यातील ग्रामीण भागात अद्यापही होम आयसोलेट असलेले कोव्हीड पॉझिटिव्ह रुग्ण घराबाहेर फिरताना दिसतात. कोव्हीड पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीच्या घरातील नातलग आपली कोव्हीड टेस्ट करत नाहीत. कोव्हीड टेस्ट केल्यानंतर आपला टेस्ट रिपोर्ट येईपर्यंत घराबाहेर पडण्यास बंधन असतानाही नागरिक समाजात फिरताना आढळतात. जिल्ह्याबाहेरून आलेल्या व्यक्ती होम क्वारंटाईन शिक्का असतानाही बिनदिक्कत घराबाहेर फिरतात. त्यामूळे कणकवली तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा फैलाव वाढत आहे.त्यामुळे कोव्हीड -19 चे नियम न पाळणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी मिलिंद मेस्त्री यांच्यासह कोदे आणि परुळेकर यांनी केली आहे.