*कोकण Express*
*हाॅटस्पाट असलेल्या माजगाव मधिल रेड झोन क्षेत्र सॅनिटाईज..*
*संजु विरनोडकर टीमचे धाडसी कार्य…*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
माजगाव व सावंतवाडी शहर हे जवळ जवळ लोकवस्तीने एकसंघ झालेल आहे. माजगाव येथे आत्तापर्यत 140 येवढे कोरोना बाधित नागरीक मिळाले व त्यापैकी बरे होवुन 58 कोरोना बाधित सक्रिय आहेत.आठ नागरिकांचा मृत्यु आत्तापर्यत झाल्यामुळे व बाधितांचे प्रमाण वाढत चालल्याने हे माजगाव सर्वानुमते निर्णय घेवून काहि दिवस बंद ठेवण्यात आले होते. ग्रामसेवक संदिप गोसावी व सरपंच दिनेश सावंत यानी संजु विरनोडकर याना संपर्क करून पंचक्रोशीतिल सर्व रेड झोन मधिल नागरीकांच्या घरी व वाडीवर. माजगाव ग्रामपंचायत व संजु विरनोडक टिमच्या सहाय्याने निर्जतुकीकरण केले.
या टिमने आत्तापर्यत तिन टप्प्यात हे निर्जतुकीकरण करताना फाॅरेस्ट काॅलनी,क्रिश्चन वाडी,कुभार वाडी, न वजिवन सोसायटी,कासारवाडा, तांबळ गोठण,म्हालटकर वाडा,दुर्वाकुर सोसायटी, खोत वाडा, हरसावंत वाडा, फॉरेस्ट कॉलनी, चिपटेवाडी, नाईकवाडा, दळवी वाडा,मेटवाडा,भटवाडी, खालची आळी जाधव वाडी या ठिकाणच्या कंटाईन्मेट झोन मधिल घरांमध्ये निर्जंतुक फवारणी केली व धाडसी ऊपक्रम राबवीला व नागरिकांचे मनोबल वाढवुन सामाजिक बांधिलकी जोपासली. माजगाव सरपंच दिनेश सावंत यानी प्रत्येक हाकेला हि टिम सहकार्य करत आली व सचोटीने कार्य केले म्हणून प्रशंसा केली.ऊपसरपंच संजय कानसे यांनी पण नागरिकांसाठी आतापर्यंत राबवलेल्या उपक्रमाची माहिती दिली. पंचायत समिती सदस्य बाबू सावंत यांनी पण संजू विरनोडकर टीमचं कौतुक करत त्यांना जिल्हाभर चाललेल्या या उपक्रमाला पूर्ण सहकार्य करू असे म्हणाले .ग्रामसेवक संदीप गोसावी यांनी कोरोनाच्या या महामारीत सर्व गाव मतभेद व राजकारण विसरून एकजुटीने सहकार्य करते म्हणून ग्रामस्थांचे आभार मानले. या उपक्रमात सरपंच दिनेश सावंत उपसरपंच संजय कांनसे, रिचर्डस डिमेलो आरोग्य विभागाचे श्री गवस श्रीमती नाईक व ग्रामपंचायत सदस्य आणि संजू वीरनोडकर टीमचे संतोष तळवणेकर सागर मळगावकर तुषार बांदेकर आकाश मराठे, व ग्रामपंचायत कर्मचारी सहभागी झाले नागरिकांनी या धाडसी उपक्रमाबद्दल या टीमला धन्यवाद दिले.