*कोकण Express*
*नापणे येथील ऊस संशोधन केंद्राला मिळणार स्वतंत्र वीज डीपी – सुधीर नकाशे*
*वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांसमवेत प्रकल्पस्थळी केली पाहणी*
*वैभववाडी ः प्रतिनिधी*
नापणे येथे मंजूर असलेल्या ऊस संशोधन केंद्राच्या ठिकाणी वीज वितरणची स्वतंत्र डीपी (रोहीत्र) बसविण्यात येणार आहे. यासंदर्भात वीज वितरणच्या अधिकाऱ्यांनी प्रकल्पस्थळी जावून जागेची पाहणी केली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुधीर नकाशे, प्रकल्प अधिकारी विजय शेटे, उद्योजक विकास काटे, संदीप सरवणकर, वीज वितरण अधिकारी श्री. मुल्ला, नापणे सरपंच जयप्रकाश यादव, उपस्थित होते.
ऊस संशोधन केंद्र मंजूर झाल्यानंतर प्रकल्पस्थळी कामाला सुरुवात झाली आहे. या केंद्राला वीजेच्या संदर्भात कोणतीही अडचण येऊ नये, म्हणून याठिकाणी स्वतंत्र डीपी मंजूर करण्यात यावी अशी मागणी आम्ही केली होती. अधिकाऱ्यांनी या संदर्भात सकारात्मक पावले उचलली असून पुढील काही दिवसात डीपी बसविण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले असल्याचे सुधीर नकाशे यांनी सांगितले.