*कोकण Express*
*म्हापण जिल्हा परिषद सदस्य सुनील म्हापणकर यांचे निधन*
*वेंगुर्ले ः प्रतिनिधी*
वेंगुर्ले तालुक्यातील म्हापण मतदार संघाचे शिवसेनेचे म्हापण जिल्हा परिषद सदस्य श्री.सुनिल म्हापणकर यांचे आज सोमवारी सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा मुलगी असा परिवार आहे. जिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाची बातमी येताच परूळे गावा सह तालुक्यात शोककळा पसरली आहे.