कोविड सेवा बजावणारे शिक्षकांना प्रथम प्राधान्याने लसीकरण करावे.

कोविड सेवा बजावणारे शिक्षकांना प्रथम प्राधान्याने लसीकरण करावे.

*कोकण  Express*

*कोविड सेवा बजावणारे शिक्षकांना प्रथम प्राधान्याने लसीकरण करावे..*

*सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक शिक्षक भारतीची प्रशासनाकडे मागणी..*

*सिंधुदुर्ग/प्रतिनिधी:*

आरोग्य कर्मचारी तसेच पोलिस यंत्रणेला शासनाने फ्रंन्टलाईन कोरोना योध्दा म्हणून प्रथम प्राधान्याने लसीकरण केले आहे. मात्र माध्यमिक व प्राथमिक शिक्षकांनाही फ्रंन्टलाईन वर्करच्या कोराना ड्युटी लाऊनही त्यांच्या आरोग्यबाबत शासन गंभीर नसल्याचा आरोप सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षक भारती संघटनेने केला असून जोपर्यंत शिक्षकांना लस दिली जात नाही तोपर्यंत कोवीडची ड्युटी लावू नये अशी मागणी शिक्षक भारती संघटनेचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य शिक्षक भारतीचे प्रमुख कार्यवाह संजय वेतुरेकर व सचिव सुरेश चौकेकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.अशी माहिती शिक्षक भारतीचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत आडेलकर,राज्य प्रतिनिधीचंद्रकांत चव्हाण,संघटक समीर परब,महिला आघाडी प्रमुख सुस्मिता चव्हाण यांनी दिली.
शिक्षक भारती संघटनेने आपल्या निवेदनात असेही म्हटले आहे की,शिक्षकांचा वापर प्रत्येक कामासाठी सरकारकडून केला जातो मात्र, जेंव्हा त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो तेंव्हा त्यांच्याकडे अक्षम्यदुर्लक्ष केले जाते.
त्यामुळे कोरोना संसर्ग झालेल्या शिक्षकांना वेळीच उपचार न मिळाल्याने राज्यभर २१५शिक्षकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. अख्खी कुटुंबच्या- कुटुंब उध्वस्त झाली असल्याच्या घटना ताज्या आहेत.
…तर शिक्षकांनी सहकार्य का करावे?आमचे शिक्षक कोणतेही शासनाचे काम नाकरत नाहीत आणि नाकारणारही नाही. पण, त्यांच्या आरोग्याची जबाबदारी जर शासनाकडून झटकली जात असेल तर शिक्षकांनी प्रशासनाला का सहकार्य करावे? असा सवालही शिक्षक भारती संघटनेने केला आहे.राष्ट्रीय आपत्ती च्या नावाखाली शिक्षकांची सध्या पिळवणूक सुरू आहे ती त्वरित थांबवावी असेही या प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.बोटावर मोजता येतील इतक्याच शिक्षकांचा लसीकरण-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांनाही अशाचप्रकारे लसीकरणाशिवाय असुरक्षितरित्या कोवीड- १९ कामगिरीवर काढले असून यापैकी अगदी बोटावर मोजता येतील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!