*कोकण Express*
*गोव्याच्या माजी मुख्यमंत्र्यांचा कणकवली भाजपकडून निषेध!*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर एकीकडे एकमेकांची शत्रू असलेली राष्ट्रही एकमेकांना मदतीचा हात देत आहेत. तर दुसरीकडे आपल्या शेजारील राज्याचा माजी मुख्यमंत्री सिंधुदुर्गाला ऑक्सिजन सिलेंडर दिले म्हणून मुख्यमंत्र्यांवर आरोप करत आहेत. आजपर्यंत गोवा आणि सिंधुदुर्ग यांचे संबंध स्नेहाचे राहिलेले आहेत. किंबहुना सिंधुदुर्ग हा गोव्याचाच भाग असल्यासारखे वातावरण आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऑक्सिजनची कमतरता असल्याने खा. नारायण राणे यांनी गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना ऑक्सिजन सिलिंडर मिळण्यासाठी विनंती केली.
खरंतर गोव्यातही मुबलक सिलिंडर आहेत असा भाग नाही, परंतु, डॉ प्रमोद सावंत यांनी शेजारधर्माच्या नात्याने, तातडीची गरज म्हणून काही सिलिंडर पाठवण्याची व्यवस्था केली. या गोष्टीचे गोवा काँग्रेस कडून राजकारण केले जात आहे. मुख्यमंत्र्यांना या विषयावरून लक्ष्य करणारे दिगंबर कामत यांचा भारतीय जनता पार्टी कणकवली जाहीर निषेध करण्यात आला. त्यावेळी भाजपा कणकवली शहर मंडल अध्यक्ष मिलींद मेस्त्री, भाजपा जिल्हा कार्यालय प्रमुख समर्थ राणे, कळसुली बूथ अध्यक्ष सचिन पारधीये, नागवे बूथ अध्यक्ष सचिन खेडेकर व आदी उपस्थित होते.