*कोकण Express*
*सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या मागणीला यश*
*शिष्यवृत्ती परीक्षा तुर्तास पुढे ढकलली”-श्री.वामन तर्फे*
*सिंधुदुर्ग*
संपुर्ण राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहाता मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने रविवार दिनांक २३/५/२१रोजी होणारी इयत्ता पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा तुर्तास पुढे ढकलावी अशी आग्रही मागणी सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीने मा.शिक्षणमंत्री श्रीमती वर्षाताई गायकवाड,मा.संचालक, प्राथमिक व माध्यमिक यांच्याकडे करण्यात आलेली होती.तसेच महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाच्या वतीनेही निवेदनाद्वारे परिक्षा पुढे ढकलावी अशी आग्रही मागणी केली होती.सदर मागणीनुसार मा.आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ,पुणे यांनी आज लेखी आदेश काढुन तुर्तास परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे जाहीर केले.यापुढे परीक्षा कधी कधी होणार याबाबत स्वतंत्र आदेश काढुन कळविण्यात येणार आहे.मा.आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे या निमित्ताने चे जाहीर आभार.या निर्णयाबाबत संघाचे अध्यक्ष श्री वामन तर्फे व सचिव श्री गुरुदास कुसगांवकर यांनी समाधान व्यक्त केले.