*कोकण Express*
*अर्पणा कोठावळेंचा पाठपुराव्याला अखेर यश ; पालकमंत्र्यासह खासदारांचे मानले आभार..*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
कोरोना काळात आपल्या जीवावर उदार होवून सेवा बजावणाऱ्या आशाताईंच्या मानधनात पाचशे रुपयांची वाढ करण्याचा निर्णय पालकमंत्री उदय सामंत यांनी घेतला आहे. याबाबत येथील शिवसेनेच्या महिला पदाधिकारी अर्पणा कोठावळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पाठपुरावा केला होता. आपली मागणी मान्य झाल्यामुळे सौ. कोठावळे यांनी पालकमंत्री व खासदारांचे आभार मानले आहेत. याबाबत त्यांनी प्रसिध्दी पत्रकाच्या माध्यमातून माहीती दिली आहे. आशा ताईंचे मानधन वाढावे, यासाठी आपण व सहकारी कार्यकर्ते गायत्री कांडरकर, अर्पणा राउळ, सरोज पाटणकर, दर्शना सावंत, अनुष्का गोवेकर, सुजाता धुरी, गायत्री मयेकर, सावली सावंत आदींनी मागणी केली होती. ती मागणी पुर्ण झाल्यामुळे आता आशाताईंना काहीसे समाधान मिळणार आहे, असे कोठावळे यांनी पत्रकात म्हटले आहे.