*कोकण Express*
*सिंधुदुर्गात कोव्हीशील्डचे १८ हजार तर कोव्हॅक्सिनचे ६०० बूस्टर डोस प्राप्त….!*
*45 वर्षावरील नागरिकांना दिलासा मात्र 18 ते 44 वयोगटातील नागरिकांमधून नाराजी….!*
*ऑनलाईन रजिस्टेशन ठरतेय कूचकामी…!*
*कणकवली ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्गात 45 वर्षावरील नागरिकांसाठी कोव्हीशील्डचे 18 हजार तर कोव्हॅक्सिनचे 600 बूस्टर डोस दाखल होत आहेत. तर 10 मे पासून 45 वर्षावरील नागरिकांसाठी दुसरा डोस सिंधुदुर्गातील 26 प्राथमिक आरोग्य केंद्रे व 10 शासकीय लसीकरण केंद्रे अशा प्रकारे 36 केंद्रावर लसीकरण होणार असून 10 मे व 11मे या दिवशी दररोज 250 डोस दिले जाणार आहेत. मात्र, 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना लस देण्यासाठी करावे लागणारे ऑनलाईन राजिस्टेशन कूचकामी ठरत असल्याने या वयोगटातील नागरिकानां प्रतिक्षा करावी लागत आहे. विशेष म्हणजे अवघ्या काही मिनिटांत ऑनलाईन राजिस्टेशन फुल होत असल्याने मोठी गैरसोय होत आहे.
यामुळे लसीकरण पूर्ण होणार कसे?18 ते 44 वयोगटातील नागरिकांना लस मिळणार कधी असे प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केले जात आहेत.
जिल्ह्यात कोव्हीशील्डचे 18 हजार तर कोव्हॅक्सिन
600 बूस्टर डोस दिले जाणार आहेत. यामध्ये कणकवली तालुक्यातील वरवडे, कलमठ, केनेडी, फोंडा, खारेपाटण, नांदगाव, उपजिल्हा रुग्णालय कणकवली अशा सात केंद्रासाठी 3 हजार 500 डोस प्राप्त झाले आहेत. तर वैभवाडी तालुक्यातील उंबर्डे, ग्रामीण रूग्णालय वैभवाडी यांना प्रत्येकी 500 अशा प्रकारे 1 हजार डोस दिले जाणार आहेत.
देवगड तालुक्यात पडेल, मिठबाव, शिरगाव, मोंड, फणसगाव व ग्रामीण रुग्णालय या सहा केंद्रांना 3 हजार डोस दिले जाणार आहेत.
दोडामार्ग तालुक्यातील मोरगाव व ग्रामीण रुग्णालयासाठी 1 हजार डोस प्राप्त झाले आहेत.
मालवण तालुक्यातील गोळवण, मसुरे, आचरा, हिवाळे व ग्रामीण रुग्णालय मालवण या पाच केंद्रासाठी 2 हजार 500 डोस तर कुडाळ तालुक्यातील कडावल, हिर्लोक, वालावल, कसाल, जिल्हा रुग्णालय ओरोस व ग्रामीण रुग्णालय कुडाळ या सात केंद्रासाठी 3 हजार 500 डोस देण्यात येणार आहेत.
वेंगुर्ले तालुक्यासाठी 1 हजार 500 डोस प्राप्त झाले असून तुळस,उपजिल्हा रुग्णालय शिरोडा,ग्रामीण रुग्णालय वेंगुर्ले येथे हे डोस दिले जातील.
सावंतवाडी तालुक्यातील आंबोली, मळेवाड, निरवडे, उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथे मिळून 2 हजार डोस दिले जाणार आहेत. तर कोव्हक्सीन बूस्टर डोस 45 वर्षावरील 600 डोस प्राप्त झाले आहेत. कासारडे, इळये,चौके,कट्टा,माणगाव,रेडी,आडेली, परूळे, बांदा, तळकट, सांगेली, भेडशी या प्रथमिक आरोग्य केंद्रासाठी प्रत्येकी 50 डोस देण्यात आले आहेत.
कोविडशील्डचे 18 हजार बूस्टर डोस तर कोव्हक्सीनचे 600 बूस्टर डोस प्राप्त झाल्याने जिल्ह्यातील 18 हजार 600 नागरिकांना याचा लाभ घेता येणार आहे.