आमदार वैभवजी नाईक यांच्या उपस्थितीत कुडाळ महिला व बाल रुग्णालय येथे ६ ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर वाटप

आमदार वैभवजी नाईक यांच्या उपस्थितीत कुडाळ महिला व बाल रुग्णालय येथे ६ ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर वाटप

*कोकण Express*

*आमदार वैभवजी नाईक यांच्या उपस्थितीत कुडाळ महिला व बाल रुग्णालय येथे ६ ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर वाटप*

*कुडाळ ः प्रतिनिधी*

आमदार वैभवजी नाईक यांच्या उपस्थितीत कुडाळ महिला व बाल रुग्णालय येथे ६ ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटरचे वाटप करण्यात आले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोविड रुग्ण वाढत असल्याने ऑक्सीजन बेडची आवश्यकता भासत असल्याने जिल्ह्यात ऑक्सीजन बेड वाढवण्यासाठी कार्यवाही सुरु असल्याचे आमदार वैभव नाईक यांनी सांगितले. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या ऑक्सीजन प्लॅन्टचे काम लवकरात लवकर सुरु करण्यात येईल अशी ग्वाही आमदार वैभव नाईक यांनी दिली
यावेळी शिवसेना तालुका प्रमुख राजन नाईक, जि. प. सदस्य नागेंद्र परब, संतोष शिरसाट, कुडाळ तहसीलदार पाठक,डॉ. कांबळी, डॉ. लींगायत, डॉ. मुक्ता दुधगावकर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!