*कोकण Express*
*राज्यातील पत्रकारांचा समावेश “फ्रंट लाईन”मध्ये करण्यात यावा…*
*उदय सामंत,विनायक राऊतांची मागणी ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना निवेदन…*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कोविडच्या काळात प्रामाणिकपणे काम करणार्या सिंधुदूर्गसह राज्यातील पत्रकारांचा समावेश “फ्रंट लाईन”मध्ये करण्यात यावा, अशी मागणी खासदार विनायक राऊत आणि पालकमंत्री उदय सामंत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केले आहे. त्यांनी दिलेल्या पत्रात असे म्हटले आहे की, कोरोनाच्या काळात काम करणार्या पत्रकारांनी आपल्या जीवावर उदार होवून काम केलेले आहे. तसेच कार्यरत असताना काही पत्रकारांचे निधन झाले आहे. त्यामुळे या पत्रकारांना फ्रंट लाईनमध्ये समावेश करण्यात यावा,अशी मागणी त्यांनी केली आहे.